Pune Police PI Transfer
पुणे, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
Pune Police PI Transfer | पुणे शहर पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनुभवी आणि तरुण कर्तबगार अधिकाऱ्यांना संधी दिली आहे. काल दि. ११ रोजी रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियुक्ती आदेश काढले आहेत.
दसऱ्याचा मुहूर्त साधत नवीन पोलीस ठाण्यांत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. हडपसर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चंदननगर, लोणीकंद, कोंढवा पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन काळेपडल, बाणेर, खराडी, फुरसुंगी, नांदेडसिटी, आंबेगाव, वाघोली या नविन पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली आहे.
१. शरद आसाराम झिने – गुन्हे पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ ते वपोनि आंबेगाव पोलीस ठाणे
२. अतुल मुरलीधर भोस – गुन्हे पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड ते वपोनि नांदेडसिटी पोलीस ठाणे
३. महेश गुंडाप्पा बोळकोटगी – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वपोनि बाणेर पोलीस ठाणे
४. विजयानंद पद्माकर पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी ते वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे
५. संजय गुंडाप्पा चव्हाण – वपोनि चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि खराडी पोलीस ठाणे
६. अनिल शिवाजी माने – गुन्हे पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि चंदननगर पोलीस ठाणे
७. पंडित हणमंतराव रेजितवाड – वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि वाघोली पोलीस ठाणे
८. सर्जेराव शामराव कुंभार – गुन्हे पोलीस निरीक्षक विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे
९. श्रीमती मंगल शामराव मोंढवे – वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वपोनि फुरसुंगी पोलीस ठाणे
१०. शंकर भिकू साळुंखे – गुन्हे पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे
११ मानसिंग संभाजी पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ते वपोनि काळेपडल पोलीस ठाणे
तसेच मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली पुढील प्रमाणे
१. राहुल वीरसिंग गौड – गुन्हे पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे
२. अमर नामदेव काळंगे – गुन्हे पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे
३. राजेंद्र भाऊराव पन्हाळे – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलीस ठाणे
Maharashtra Mirror (@maharashtramirrornews) • Instagram photos and videos
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…