Pune Police News : तीन गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे, पुण्यात दोन ठिकाणी कारवाई, दोघांना अटक
Pune Police Unit 6 News : गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन ठिकाणी कारवाया करत गुन्हे शाखा युनिट- 6 एकूण दोन आरोपींना जेरबंद केले.
पुणे :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, बंदूक, पिस्टल वापरण्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.गुन्हे शाखा युनिट-6 यांनी Pune Crime Branch Unit 6 केलेल्या कारवाईमध्ये तीन गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन ठिकाणी वेगवेगळ्या कारवाया करत गुन्हे शाखेने एकूण दोन आरोपींना जेरबंद केले.
पुणे पोलीसांच्याच गुन्हे शाखा युनिट -6 यांच्या कार्यक्षेत्रातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 नोव्हेंबरला केलेल्या कारवाईत आरोपी साहिल राजू शेख (24 वय, रा.वडाचीवाडी रोड, उंड्री पुणे ) आरोपीकडून पोलिसांनी एक गावठी बनावटीच्या पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत.
तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 10 नोव्हेंबरच्या दरम्यान आरोपी जैद जावेद खान (22 वय, रा. हांडेवाडी पुणे) याच्याकडे कौशल्य पूर्व तपासणी केली असता पोलिसांनी त्याच्याकडे बेकायदेशीर रित्या विनापरवाना बाळगलेले दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही कारवाईत एकूण तीन गावठी पिस्टल चार जिवंत काडतुसे जप्त केले असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आर्म ॲक्ट कलम 3(25) पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 37 (1) (अ) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा युनिट -6 यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार,गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.