क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Police News : न्यायालयातून पळालेल्या ‘मास्टरमाईंड’ला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचा ‘सिनेमा स्टाईल’ सापळा; शिवाजीनगर पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद

Pune Police Latest News : मोका कायद्यातील आरोपी अनमोल जाधवरावला शिक्षा झाल्यानंतरही फरार; ‘क्राईम पेट्रोल’ पाहून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला वाघोलीतून अटक

पुणे :- न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर न्यायव्यवस्थेला आव्हान देत परिसर सोडून पळून गेलेल्या एका सराईत आणि ‘मोका’ कायद्यातील आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी Shivaji Nagar Police News फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. आरोपी अनमोल अतुल जाधवराव (वय 36, रा. कोथरूड, पुणे) हा अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत होता. Pune Police Latest News

पळाल्यावर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांनी सन 2013 मध्ये दाखल केलेल्या एका गंभीर गुन्ह्यात अनमोल जाधवराव याला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. शिक्षा झाल्यानंतर अनमोल हा 19 जुलै 2025 रोजी न्यायालय परिसरातून पळून गेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘क्राईम पेट्रोल’ पाहून पोलिसांना चकमा

अटक टाळण्यासाठी आरोपी अनमोल जाधवराव हा विविध ठिकाणी वेषभूषा बदलून वावरत होता. नाशिक, मुंबई, सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्यातील भेडसे, मुळशी, हवेली अशा विविध भागांमध्ये तो सतत ठिकाणे बदलत होता. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला की, तो ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’, ‘सीआयडी’ यांसारखे टी.व्ही.वरील गुन्हेगारी कार्यक्रम (सिरीयल) पाहत होता. पोलीस आरोपींना कसे शोधतात, याची माहिती घेऊन तो त्यानुसार आपले पळण्याचे तंत्र बदलत होता.

तो लोकांना ‘माझा मोबाईल हरवला आहे’ असे कारण सांगून मित्रांशी संपर्क साधत असे आणि लगेच ते ठिकाण बदलून दुसऱ्या शहरात पळून जात असे.

पोलिसांनी रचला सापळा

दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाहिजे आरोपी अनमोल जाधवराव हा एका चारचाकी गाडीतून अहिल्यानगरकडून वाघोली, पुणे या दिशेने येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित काचेळी हॉटेलसमोर, खांदवे नगर येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार गाडी येताच पोलिसांनी तिला चारही बाजूंनी घेरले आणि दुपारी सुमारास दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव अनमोल अतुल जाधवराव असल्याचे कबूल केले.

या कारवाईत अनमोलसोबत गाडीत असलेला दुसरा इसम अक्षय संजय मंचर याच्याकडेही चौकशी केली असता, तो देखील एका दुसऱ्या गुन्ह्यात (भिमनगर कॅम्प पोलीस स्टेशन) पाहिजे आरोपी असल्याचे उघड झाले. त्याला पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.

आरोपी अनमोल जाधवराव याच्यावर यापूर्वीही चतुःश्रृंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात हत्यारांचा वापर, शासकीय कामात अडथळा आणणे, आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0