पुणे, दि. 14 मार्च, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Police News
मुंढवा परिसरात निर्जनस्थळी नागरिकांना गाठून मोबाईल फोन जबरी चोरी करणाऱ्या ‘चांडाळ चौकडी’ला मुंढवा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंढवा वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाय योजना केल्या जात आहेत. Pune police news
संशयित आरोपी १) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) ऋषीकेश ऊर्फ भोन्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे ३) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे. ४) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसे आळी, केशवनगर पुणे. यांना अटक करण्यात आली आहे.
दि. 8 मार्च रोजी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर, शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे येथे फिर्यादी यांचा सैमसंग कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेणारे १) सारंग ऊर्फ सान्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्ष, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) ऋषीकेश ऊर्फ भोयऱ्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्ष, रा. सदर असे ०२ आरोपीतांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली.
इतर आरोपीचा शोध घेत असता सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे यांना माहिती मिळाली की, पाहीजे आरोपी मुंढवा परिसरात थांबले आहेत. यावरून आरोपी १) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे २) हेमंत उर्फ लाल्या बिलास गायकवाड, वय २१ वर्ष, रा. सर्वे नंबर ५, मुंगसेआळी, केशवनगर पुणे यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींकडे दाखल गुन्हयांचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, गुन्हयाची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करतांना वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.
अटक आरोपींचे पूर्व रेकॉर्ड :-
१) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे याचे विरुद्ध दखलपात्र ०७ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.
२) ऋषीकेश ऊर्फ भोन्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे, रा. सदर याचे विरुद्ध दखलपात्र ०५ गुन्हे,
३) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे याचे विरुद्ध दखलपात्र ०२ गुन्हे, अदखलपात्र ०१ गुन्हे.
४) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसे आळी, केशवनगर पुणे यांचे विरुद्ध दखलपात्र ०१ गुन्हे.
सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे, दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, महेश पाठक, दिपक कदम, राहूल मोरे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील व इतर टिम यांनी केली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…