Pune Police News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचा रूट मार्च
•Pune Police route march in the wake of assembly elections पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांचा सहभाग
पुणे :- राज्यात विधानसभेच्या 288 जागे करिता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्व पक्षांनी आपले उमेदवारी याद्याही जाहीर केले आहे अशातच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाकडून कंबर कसण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यभरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला होता.रूट मार्च करिता पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर .राजा तसेच कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, सहभागी होते.
पोलीस निरीक्षक गुन्हे शेख ,तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक 15 कर्मचारी हजर होते. तसेच बी एस एफ चे पोलिस निरीक्षक प्रभात तसेच 12 उपाधिकारी 47 जवान हजर होते. रूट मार्चचा मार्ग – शितल पेट्रोल पंप ते आशीर्वाद चौक ते मिठा नगर ते अल्पलहा मज्जिद ते नवाजिश चौक उजवीकडे वळून मक्का मस्जिद ते पिताश्री आश्रम भाग्यदय नगर परत उजवीकडे वळून हंस कुटी आश्रम ते मलिका अंबर मस्जिद ते भैरवनाथ मंदिर कोंढवा खुर्द गावठाण ते मनपा शाळा कोंढवा खुर्द ते ज्योती चौक येथे समाप्त करण्यात आला आहे.