Pune Banner Police Arrested Ganja Seller : साडेतीन किलो गांजा जप्त, तपास सुरू; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पुणे: पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना बाणेर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 3 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
रवी विजय वर्मा (वय 19) आणि कौशलेंद्र नथुराम वर्मा (वय 23, दोघे रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हे दोघे बाणेर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 किलो 400 ग्रॅम गांजा आढळून आला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हा गांजा कोठून आणला आणि ते कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे पुणे शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरू पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे आणि सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात सहायक निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, उपनिरीक्षक संदेश माने, शैला पाथरे, सहायक फौजदार सपकाळ, गायकवाड, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे आणि काळे यांचा समावेश होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…