Pune Police Anand Jangam Officer : आनंद जंगम यांच्या 32 वर्षाच्या पोलीस सेवेत प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 304 बक्षिसे त्यांना पोलीस दलातून देण्यात आली आहे
पुणे :- 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Pune Police Republic Day राज्यातील पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राष्ट्रपती यांच्याकडून राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशासनाने त्यांचे नावे भारत सरकारला कळवले होते. पुण्याच्या सीआयडी ऑफिस शिवाजीनगर येथे सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आनंद रामचंद्र जंगम Pune Police CID Office Shivajinagar Officer Anand Jangam यांना त्यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्याकडून आनंद रामचंद्र जंगम यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आले आहे.
आनंद रामचंद्र जगम हे मूळचे रेवणसिद्ध नाथ देवस्थान विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील असून 18 मे 1992 रोजी पुणे रेल्वे पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) म्हणून भरती झाले होते.
8 जानेवारी 1999 ते 1 ऑगस्ट 2006 पर्यंत, जंगम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी), पुणे युनिटमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले. या काळात, त्यांनी अतुलनीय कामगिरी मुळे त्यांना या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक ब्यूरो (एसीबी) पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांना एक आगाऊ पगारवाढ मंजूर केली.
पुणे रेल्वे जिल्ह्यात प्रवासी सुरक्षतेच्या दृष्टिने त्यांनी अंतर्गत योजना आणि भूकंप सुरक्षा योजना अद्ययावत करून मोलाचे योगदान दिले.त्यांच्या एकूण 32 वर्षांच्या सर्विस मध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी कडून 13 प्रशस्तिपत्रक मिळाले आहेत, त्यांनी पोलीस दलामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून काम केले आहे त्यांच्या या कामगिरी बाबत त्यांना एकूण 304 बक्षिसे असून त्यांच्या पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बाबत माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांचे पोलीस पदक 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…