क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Police News : पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचा थरारक पळपाट!शासकीय रुग्णालयातून पलायन; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Pune Police Latest News : अत्याचार, गोळीबार, बंदुकीचा धाक — गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुनील लोखंडे फरार

पुणे: अत्याचार, बंदुकीचा धाक आणि पोलिसांवर गोळीबार अशा गंभीर आरोपांखाली न्यायालयीन कोठडीत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (वय 52) काल सकाळी पोलिसांच्या ताब्यातून जिल्हा सरकारी रुग्णालयातून नाट्यमय पद्धतीने फरार झाला. या घटनेने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. Pune Police News

लोखंडेवर अत्याचाराच्या गुन्ह्यातील महिलेवर दबाव आणण्यासाठी तिच्या घरी जाऊन बंदुकीचा धाक दाखवणं, मुलींना ओलीस धरण्याचा प्रयत्न, व नंतर पोलिसांवर हवेत गोळीबार करत थेट एका उपअधीक्षकावर हल्ला करण्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात त्याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटकही झाली होती.

गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. काल सकाळी 11.30 च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी त्याला सर्जिकल वार्डमध्ये नेण्यात आले होते. मात्र, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देत लोखंडेने थेट पलायन केलं. या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा Pune Tofkhana Police Station दाखल करण्यात आला असून, विशेष पथक त्याचा शोध घेत आहे.

या प्रकारामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एका प्रशिक्षित व धोकादायक आरोपीकडून मिळालेला पोबारा हा संपूर्ण यंत्रणेची ढिसाळता दाखवून देणारा प्रकार मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0