क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Police News : चार वर्षांपासून फरार आरोपी अखेर अटकेत जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस

Pune Latest Crime News : आरोपी शिवा मिठु भोसले याने चाकूने मारहाण करून जबरी चोरी केली होती

पुणे :- जबरी चोरीच्या गुन्ह्यातील Pune Robbery Case फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. Pune Gramin Police News आरोपी शिवा मिठु भोसले (वय 45 रा. पिटकेश्वर, भोंगवस्ती, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता.

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या Walchandan Nagar Police Station हद्दीतील निरवांगी ता. इंदापूर येथील एका घरात 17 जानेवारी 2024 रोजी कुटुंबातील लोकांना चाकूने मारहाण करून जबरी चोरी केली होती.

गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, , पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे परिसरात साक्षीदारांकडे तपास करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळा पासून जाणारे येणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काही संशयित व्यक्ती निदर्शनास आले होते. त्या फुटेज मधील व्यक्तीचे वर्णन व गुन्हा करणेसाठी आलेले आरोपींचे वर्णनात साम्य होते, त्याअनुषंगाने पथकाने प्राप्त फुटेज हे गोपनीय बातमीदारांना दाखविले असता, संशयित व्यक्ती हा रेकॉर्डवरील आरोपी शिवा मिठु भोसले हा असून त्यानेच त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या माहितीचे आधारे निष्पन्न आरोपी शिवा भोसले याचा स्थानिक गुन्हे शाखे चे पथकाने वारंवार जावून शोध घेतला असता, तो वेळोवेळी गुंगारा देत होता.

गुन्हे प्रकटीकरणाचे अनुषंगाने हजर असताना पोलीस हवालदार स्वप्निल अहोवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी शिवा भोसले आहे सराफवाडील चौकात आलेला आहे, अशी बातमी मिळाल्याने पथकाने सापळा रचून आरोपी शिवा मिठु भोसले याला ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने वरील नमुद गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करते वेळी त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात 3 आणि वालचंदनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक

पोलीस अधीक्षक शपंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, अंमलदार बाळासाहेब कारंडे, ज्ञानदेव क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, अतुल डेरे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0