Pune Police Mcoca Action | रामटेकडी येथे डिलेव्हरी बॉयला लुटणाऱ्या गायकवाड टोळीवर मोक्का
शुभम गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याचे ०७ साथीदार यांचेविरूध्द मकोका अंतर्गत कारवाई
पुणे, दि. २८ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police Mcoca Action | Mokka on Gaikwad gang robbing delivery boy at Ramtekdi
डॉ.डब्ल्यु.आर. खान ऊर्दू शाळेच्या मागील गल्लीत सार्वजनिक शौचालयाजवळ आण्णाभाऊ साठे वाचनालय रामटेकडी हडपसर येथे डिलेव्हिरी बॉयला हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या शुभम गायकवाड व त्याच्या ७ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी मोक्का कारवाईचा दणका सुरूच राहणार असल्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. पुणे पोलिसांकडून यावर्षातील १४ वी मोक्का कारवाई आहे.
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी १) करण किसन शिंदे वय १९ वर्षे, रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर पुणे. (टोळी सदस्य) २) मुज्जमिल मतीन शेख वय १८ वर्षे रा. आनंदनगर रामटेकडी, हडपसर पुणे. (टोळी सदस्य) ३) ओम राजु मैनवाल वय १८ वर्षे, म्हाडा बिल्डींग रामटेकडी हडपसर पुणे. (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अटक करण्यात आली आहे. ४) शुभम राघु गायकवाड वय २४ वर्षे, रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर पुणे. (टोळी प्रमुख, पाहिजे आरोपी) ५) विशाल रवि जाधव रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर पुणे. (टोळी सदस्य, पाहिजे आरोपी) तीन (विधिसंघर्षित बालक) यांना ताब्यात घेतले आहे.
डिलेव्हिरी बॉय यास शिवीगाळ करुन जबरदस्तीने सॅक चेक करुन सॅक मधील हार्ड डिस्क, चेक बुक, २०००/- रुपये रोख रक्कम धारदार हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादी यांचेकडुन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन आरोपी पळुन गेले होते. म्हणुन फिर्यादी यांनी तीन ते चार अनोळखी इसमांविरूध्द कायदेशिर तक्रार दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं.९७/२०२४ भादंविक ३९५,३९२,५०४, ५०६,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii).३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर संजय पंतगे यांनी पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ५. पुणे आर राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, यांना प्रस्ताव सादर केलेला होता. त्यास आज मंजुरी देण्यात आली.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि- ५. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर, गणेश इंगळे, त्यांचे मार्गर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतगे सहा. पोलीस निरीक्षक, दिगंबर बिडवे, श्रेणी. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल कदम, उत्रेश्वर धस, महिला पोलीस अंमलदार, चैत्राली यादव यांनी केलेली आहे.