महाराष्ट्र

Pune Police Hi-Tech | पुणे पोलिस दलाची आधुनिकतेकडे वाटचाल : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

pune police drone

  • मिरवणूक, जयंती, मोर्चे आता ड्रोनच्या निगराणीखाली येणार
  • हाई-टेक उपकरण, वाहनांचा पोलिस दलात समावेश
  • आणखी दोन परिमंडळ लवकरच कार्यान्वित होणार

पुणे, दि. 9 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Police Hi-tech, Pune News, Pune Crime News

संवेदनशिल, दाटावाटीच्या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी आता थेट ड्रोनचा वापर पुणे पोलिस दलाकडून सुरू झाला आहे. पारंपारिक कॉम्बिंग, रात्र गस्त, आरोपींवर नजर ठेवण्याच्या पद्धतीला आता आधुनिक यंत्रांची साथ मिळणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस दलाला हाई-टेक बनविण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली आहेत. काल शिवाजीनगर, पर्वती, बोपदेव घाटात ड्रोनच्या सहाय्याने टेहाळणी करण्यात आली आहे. Pune Police Hi-tech, Pune News, Pune Crime News

हाईटेक उपकरणांनी पुणे पोलिस दल सुसज्ज

पोलिस आयुक्त अमितेश कुमार परिमंडळ निहाय हाईटेक वाहने व ड्रोन वापरासाठी उपलब्ध करून दिली आहेत. ड्रोनच्या वापरामुळे आता पोलिसांना घटनेच्या स्थळाची तात्काळ माहिती मिळविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच संवेदनशिल ठिकाणी ड्रोन सहजपणे पोहचणे शक्य असल्याने हिंसाचाराला आळा रोखता येणार आहे.

मिरवणूक, जयंती, मोर्चे आता ड्रोनच्या निगराणीखाली येणार…

पुणे शहरात साजरात होणारे सण-उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून ड्रोनचा वापर होण्याची शक्यता आहे. विसर्जन मिरवणूकीत आता ड्रोनचा हातभार लागणार असल्याने पुणे पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचबरोबर जयंती, मोर्चे आंदोलने ड्रोनच्या वॉचमध्ये येण्याची शक्यता आहे.

संवेदनशील भागात ड्रोनची टेहाळणी…

संवेदनशील ठिकाणी ड्रोन टेहाळणी करणार असल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस यंत्रणेला चकवा देणाऱ्या व कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांना ड्रोनची धास्ती बसणार आहे.

पर्वती, शिवाजीनगर येथे ड्रोनच्या घिरट्या

पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत वपोनि नंदकुमार गायकवाड यांच्या उपस्थितीत काल दांडेकर पूल येथील भागात पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात आली. तर दूसरीकडे शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट नं.11 येथे वपोनि महेश बोळकोटगी यांनी ड्रोनचा वापर केला.

Maharashtra Mirror

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago