Pune Police & BSF Root March | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवड्यात पोलिस व बीएसएफचा रूट मार्च
Pune Police And BSF Root March In Pune
- पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव व डेप्युटी कमांडंट मनोज कुमार यांच्यासह येरवडा वपोनि रवींद्र शेळके यांचा सह्भाग : Pune Police & BSF Root March
पुणे, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Pune Police & BSF Root March
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील भागात कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी पुणे पोलीस व बीएसएफ कडून आज दि. २१ रोजी येरवडा भागात रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी परिमंडळ-४ पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव व डेप्युटी कमांडंट मनोज कुमार यांच्यासह येरवडा वपोनि रवींद्र शेळके यांनी संचलन केले. Pune Police & BSF Root March
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील मिश्र लोकवस्ती लक्ष्मी नगर चौकी मधील भगवा झेंडा चौक, राज चौक, चित्रा चौक, भगतसिंग चौक अशा संवेदनशील भागातून, तसेच जेल रोड चौकी नागपूर चाळ, स्वराज्य मित्र मंडळ, लुंबिनी गार्डन या भागामधून आज सोमवार दि. २१ रोजी 10.30 ते 13.00 वाजेदरम्यान रूट मार्च करण्यात आला. Pune Police & BSF Root March
सदर रोड मार्चमध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, हिम्मत जाधव, BSF 30 बटालियनचे डेप्युटी कमांडंट मनोज कुमार, असिस्टंट कमांडंट नीरज पांडे, इन्स्पेक्टर अमन कुमार, 2 अधिकारी व 50 कर्मचारी, तसेच परिमंडळ 4 ची RCP मोबाईल यावरील 1 अधिकारी व 8 अंमलदार व येरवडा पोलीस स्टेशन कडील 2 अधिकारी व 15 अंमलदार असे सहभागी होते.