क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Police Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात; दोन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबी कडून अटक

ACB Arrested Pune Police Officer : फसवणूक प्रकरणातील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई.

पुणे :- फसवणुकीच्या गुन्ह्यात Pune Fraud Case Bribe आरोपी करून अटक न करण्यासाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक Pune ACB Arrested Police Officer विभागाच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. संतोष सूर्यकांत क्षीरसागर ‌लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा युनिट -3 कार्यरत आहे. Pune Police Latest News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय तक्रारदार यांचा मित्र तानाजी शेलार यांचे विरोधात दाखल असलेल्या फसवणुकीचे गुन्ह्यात तक्रारदार यांना सहआरोपी करुन अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक बहिरट यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या करीता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षिरसागर यांनी तक्रारदार यांचेकडे 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. Pune Police Latest News

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, संतोष क्षिरसागर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणी करुन, पंचासमक्ष तडजोडीअंती दोन लाख रुपये लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. संतोष क्षिरसागर यांचेवर खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या या गुन्ह्यातील सहभागाबाबत अधिक तपास सुरु आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करत आहेत. Pune Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0