पुणे

Sharad Pawar’s Vote : शरद पवार यांनी लेकीसाठी केले बारामतीत मतदान

•Sharad Pawar became Baramati voter for daughter राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि आपल्या कुटुंबासह बारामती मध्ये मतदान केले

पुणे :- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने येथे खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी सुप्रिया व सुनेत्रा यांच्यात अतितटीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघींसाठीही एकेक मतदान महत्त्वाचे बनले आहे. त्यानुसार शरद पवार आपल्या कन्या सुप्रिया सुळेंसाठी बारामतीचे मतदार बनलेत. यासाठी त्यांनी मुंबईतील मतदार यादीतील आपल्या कुटुंबाचे नाव वगळले आहे.

शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी बीसीसीआयची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी आपले मतदान ओळखपत्र बारामतीहून मुंबईत वर्ग केले होते. त्यानंतर आता ते पुन्हा लेकीसाठी मुंबईहून बारामतीत आलेत. त्यांनी मंगळवारी सकाळीच माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदाधिकार बजावला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे व मुलगी रेवती सुळे तथा मुलगा विजय सुळे यांनीही आपला मतदाधिकार बजावला.

शरद पवार व त्यांचे कुटुंबीय बारामतीच्या गोविंद बाग येथे वास्तव्यास असतात. आतापर्यंत ते व त्यांचे कुटुंबीय मुंबईत मतदान करत होते. मुंबईतील महालक्ष्मी येथील वॉर्ड क्रमांक 214 मधील मतदार यादीत शरद पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे यांच्या नावांचा समावेश होता. पण यंदा हे सर्वजण बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मतदान करणार आहेत. 2019 पर्यंत शरद पवारांकडे सिल्व्हर ओक निवासस्थानाचा पत्ता असणारे मतदान कार्ड होते. त्यानुसार त्यांनी मुंबईत मतदान केले. पण आता ते पुन्हा एकदा बारामतीचे मतदार बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0