Pune POCSO Cases | पुण्यात लिंगपिसाट झाले म्हातारे ! लहान मुलींवर अत्याचार : पॉस्को गुन्हे दाखल
- सावधान ! लहान मुलींवर लक्ष ठेवतात लिंगपिसाट
पुणे, दि. १४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune POCSO Cases | माणसांची नैतिकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यातच घराला, समाजाला नैतिकता शिकवणाऱ्या जेष्ठांकडूनच अपराध होत असेल तर धक्काच लागतो. असाच प्रकार पुण्यातील धनकवडी भागात घडला आहे. लिंगपिसाट झालेल्या दोन जेष्ठ नागरिकांकडून दोन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. याबाबत सहकार नगर पोलीस ठाण्यात (Sahkarnagar Police Station) पॉस्को (Protection of Children from Sexual Offences Act, 2012.) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Pune POCSO Cases
खाऊ देण्याचे आमिष, गळ्याला चाकू लावून अत्याचार
पहिल्या घटनेत, दि. ६ रोजी एका सात वर्षीय मुलीला लिंगपिसाट जेष्ठ नागरिकाने खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करताच तिच्या गळ्याला चाकू लावून पोलिसांना व घरच्यांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. Pune POCSO Cases
पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिल्यावरून संशयित मधुकर पिराजी थिटे, वय -७८ (धनकवडी) यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Pune news
चॉकलेट देण्याचे आमिष आणि अत्याचार
तर दुसऱ्या घटनेत, दि. ११ रोजी दुकानासमोर खेळत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला लिंगपिसाट म्हाताऱ्याकडून चॉकलेटसाठी पैसे देण्याचा बहाणा करून लगट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर चल म्हणून विनयभंग करण्यात आला. याबाबत तक्रार दाखल झाल्यावरून संशयित महावीर श्रीमलजी सिंगवी, वय -७०, (धनकवडी) याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला. Pune crime news