क्राईम न्यूज

Pune Opium Seized | भारती विद्यापीठ हद्दीतून ५७ लाखांचा अफिम जप्त

  • गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडून कारवाई

पुणे, दि. २८ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी

Pune Opium Seized | पुणे शहरातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेने धडक मोहीम उघडली आहे. आज दि. २८ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ वपोनि सुदर्शन गायकवाड यांनी एका कारवाईत भारती विद्यापीठ हद्दीतील आंबेगाव येथून एका ड्रग्स तस्कराला ताब्यात घेत तब्बल ५७ लाखांचा अफिम जप्त केला आहे.

संशयित आरोपी देविलाल शंकरलाल आहीर, रा. कात्रज, पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Opium Seized

आज दि.२८/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे देविलाल शंकरलाल आहीर, रा. कात्रज, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण ५६,९०,०००/- रु. कि.चा २ किलो ८४५ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे

Maharashtra Mirror

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago