•’फेटा खाली ठेवणार’ म्हणत महाराजांनी व्यक्त केली नाराजी; रुपाली पाटील ठोंबरेंचा पाठिंबा
पुणे :- कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे आणि नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या वैयक्तिक निर्णयामुळे टीकेचे धनी ठरले आहेत. लेकीच्या साखरपुड्यावर केलेल्या शाही खर्चावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग झाल्यामुळे महाराज चांगलेच व्यथित झाले असून, त्यांनी आता कीर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले आहेत.
शाही साखरपुडा ठरला टीकेचा विषय
काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील वसंत लॉन्समध्ये इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात गाड्यांची वरात, राजेशाही थाट आणि भव्य रोषणाई करण्यात आली होती. ‘लग्नासाठी कर्ज काढू नका’ असा सल्ला कीर्तनातून देणारे महाराज स्वतः मात्र लेकीच्या कार्यक्रमावर ‘बक्कळ पैसा’ खर्च करत असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरू झाली.
महाराजांनी व्यक्त केली नाराजी
सातत्याने होणाऱ्या टीका आणि वैयक्तिक पातळीवरील ट्रोलिंगमुळे नाराज झालेल्या इंदुरीकर महाराजांनी सार्वजनिकरित्या आपली खंत व्यक्त केली. “आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत,” असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सना फैलावर घेतले. याचवेळी त्यांनी “मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे,” असे सूचक विधान केले, ज्यामुळे त्यांच्या कीर्तन सेवा थांबवण्याच्या चर्चांनी खळबळ माजली आहे.
रुपाली पाटील ठोंबरेंचा पाठिंबा
दरम्यान, महाराजांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित इंदुरीकर महाराजांना मोलाचा संदेश दिला आहे. “विकृत छपरी लोकांकडे लक्ष देऊ नका, अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही,” अशी विनंती त्यांनी ‘लेक’ म्हणून महाराजांना केली आहे.
फेसबूकवरील अधिकृत अकाऊंटवरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी संदेश लिहीला आहे. त्यांची पोस्ट जशीच्या तशी…
” इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन,भजनातून समाजातील माता,भगिनी,बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे.अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे.त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री,पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी,चांगले विचार,चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी,विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत.त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही.ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…