पुणे
Pune News : धक्कादायक..पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या!

•खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्याच्या जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुणे :- खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यातील जंगलामधील एका झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
खडकी पोलीस ठाण्याचे तपस पथकातील अण्णा गुंजाळ हे मागील दोन तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल तसेच लागत नव्हता. त्यांचे कुटुंब आज खडकी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करणार होते. तत्पूर्वी गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याचे लोणावळा पोलिसांनी कळविले आहे. अण्णा गुंजाळे यांनी कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. गुंजाळ यांच्या आत्महत्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.