क्राईम न्यूज

Pune News : पुण्यात राजकीय वाद उफाळला! ‘पवार’ गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की; चालकावर हल्ला करून सोनसाखळी लुटली

Pune Political Update : चालकाच्या गळ्यातील 50 हजारांची सोनसाखळी आणि रोकड लंपास; ‘अजित पवार’ गटाच्या पदाधिकाऱ्यांसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे Bapu Saheb Pathare यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह 20 जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात Vimantal police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगावमधील गाथा लॉनमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही गंभीर घटना घडली.

आमदार पठारे यांचे मोटार चालक शकील अजमोद्दीन शेख यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बापूसाहेब पठारे हे शनिवारी (4 ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास लोहगावमधील गाथा लॉनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांशी वादविवाद झाले.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी आमदार पठारे यांना धक्काबुक्की केली. पठारे यांना वाचवण्यासाठी त्यांचे मोटार चालक शकील शेख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली.

चालकाची सोनसाखळी लुटली

यावेळी हल्लेखोरांनी चालक शकील शेख यांच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोनसाखळी आणि खिशातील एक हजार रुपयांची रोकड चोरून नेली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago