क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhiwandi Crime News : कोडीनयुक्त कफ सिरपच्या औषधाचा साठा करून बेकायदेशिर व विनापरवाना विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक

Bhiwandi Latest Crime News : कप सिरप औषधांवर मोठी पोलिसांची कारवाई,147 बॉक्समध्ये 17640 बॉटल्स किंमत सुमारे 31 लाख 75 हजार रुपयांच्या‌ बॉटल्स जप्त

भिवंडी :- कफ सिरपचा सर्वाधिक वापर नशेसाठी होत असल्याने त्यांची विक्री वाढली आहे. Bhiwandi Crime News मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे शहर पोलीसांनी कारवाई Thane Crime Branch Unit करत तब्बल 147 बॉक्समध्ये 17640 बॉटल्स किंमत सुमारे 31 लाख 75 हजार 200 रुपये कोडीनयुक्त कफ सिरप औषधाच्या बाटल्या बाळगणाऱ्या पाच जणांना ओवळी गावाकडे जाणारे रोडवर, ता. भिवंडी येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 22 (क) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 क, 18 अ, शिक्षा कलम 27 (ब) व 28 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यात त्यास अटक करण्यात आली आहे. जप्त बॉटल कोठुन मिळविल्या? याव्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी दरम्यान मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे शहर घटकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ओवळी गावाकडे जाणारे रोडवर, ता. भिवंडी जाणारे टाटा कंपनीचा ट्रक मध्ये अवैधरित्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. नशेसाठी वापरण्यात येणारे ONEREX कंपनीचे कोडीनयुक्त कफसिरपच्या 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स व 8 लाख किंमतीची मारूती कंपनीची डिजायर वाहनासह आढळून आल्याने त्यांना तात्काळ 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.जय मातादी कमर्शियल को.ऑ. सोसायटी एका गाळ्यातील कुंभारवाडा, एस.टी. रोडवरील सिंधी कॉलनी सोसायटी समोर, चेंबुर मुंबई याठिकाणी बेकायदेशिर व विनापरवाना विक्री करण्यासाठी बाळगलेला कोडीनयुक्त कफसिरपच्या 17160 बॉटल्ससह आढळून आल्याने त्यासही ताब्यात घेतले.पोलिसांना या कारवाई तब्बल 32 लाख 75 हजार रुपयांच्या 17640 बॉटल्स आढळून आल्या आहेत. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अटक आरोपींची नावे

1.दिलीप हरिराम पाल (वय 28)
2.ज्योतीप्रकाश हृिदय नारायण सिंग (वय 37)
3.दिनेशसिंग चेतनारायण सिंग (वय 45)
4.शामसुंदर रविशंकर मिश्रा (वय 24)
5.इकबाल साजन शेख (वय 40)

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कक्षाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन करळे, नगराज रोकडे, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, जयकर जाधव, जितेंद वाघमोडे, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, महिला पोलीस नाईक गिताली पाटील, पोलीस अंमलदार महेश सावंत ,सदन मुळे यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0