•Pune Mahatma Gandhi Statue : भगव्या वस्त्रातील माथेफिरुची अघोरी कृती; राज्यासह शहरात तीव्र संताप, काँग्रेस आक्रमक
पुणे | रविवारी मध्यरात्रीच्या अंधारात पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसर एका अघोरी कृत्याने हादरला! राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने भगवे वस्त्र परिधान करून थेट कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज शुक्ला नामक या व्यक्तीने केलेल्या या विकृत कृत्याने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सूरज शुक्लाला ताब्यात घेतले असून, या घटनेने शहरासह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे.
या गंभीर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने तातडीने आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून त्यांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
रोहित पवार म्हणाले की,”गोडसेचे वारसदार कितीही डोकं आपटू देत, गांधी विचार अमर!”
याच घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे फायरब्रँड आमदार रोहित पवार यांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. “नथुराम गोडसे गेले असले तरी, त्यांच्या विचारांचे वारसदार आजही समाजात आहेत. महात्मा गांधींच्या विचारांना संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि होणारही नाहीत,” असे ठामपणे सांगत रोहित पवार यांनी, “गोडसेच्या विचारांचे वारसदार कितीही डोके आपटले किंवा चुकीच्या गोष्टी केल्या तरी, या भूमीतून महात्मा गांधींचा विचार कधीही संपणार नाही, तो अमर राहील,” असे परखड शब्दांत सुनावले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…