• रस्त्यावर पडलेली ‘दहा लाख’ रोख रकमेची बॅग कचरा वेचक महिलेला सापडली, तेव्हा… पुणेकरांच्या विश्वासाची वीण झाली अधिक घट्ट!
पुणे :- पैशांपुढे अनेकदा इमानदारकी कमी पडते, अशा काळात पुण्यात ‘स्वच्छ’ संस्थेच्या एका कचरा वेचक महिलेने दाखवलेल्या अफाट प्रामाणिकपणाने पुणेकरांचे मन जिंकले आहे. रस्त्यावर पडलेली तब्बल दहा लाख रुपये रोख असलेली बॅग मिळताच, अंजू माने नावाच्या या महिलेने क्षणाचाही विलंब न करता ती बॅग मूळ मालकाला जशीच्या तशी परत केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून अंजू माने या नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉईंटला आणत असताना, सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव असल्याने, त्यांनी ती बॅग फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली.
बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात मोठी रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला. गेले जवळपास २० वर्षे त्या याच परिसरात काम करत असल्याने, त्या परिसरातील अनेक नागरिकांना ओळखतात. त्यांनी तातडीने ओळखीतील नागरिकांच्या मदतीने मालकाचा शोध सुरू केला.
मालकाची अस्वस्थता आणि प्रामाणिक परतफेड
शोध घेत असताना, अंजू माने यांना एक नागरिक (ज्यांनी आपली ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली आहे) अतिशय अस्वस्थपणे आणि गडबडीत काहीतरी शोधत असल्याचे दिसले. अंजू माने यांनी त्या नागरिकाला प्रेमाने बोलावून, आधी पाणी दिले आणि शांत केले. चौकशीनंतर सापडलेली बॅग त्यांचीच असल्याची खात्री होताच, अंजू माने यांनी दहा लाख रुपये रोख असलेली बॅग जशीच्या तशी त्यांच्या स्वाधीन केली.
विश्वासाची वीण झाली घट्ट
या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून संबंधित नागरिकांनी आणि परिसरातील लोकांनी मिळून अंजू माने यांचा साडी आणि काही रोख रक्कम देऊन सत्कार केला.
या घटनेतून अंजू माने यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ‘स्वच्छ’ मॉडेलमुळे कचरा वेचक आणि नागरिक यांच्यातील विश्वासाची वीण मागील २० वर्षात अधिक घट्ट झाली आहे. दररोज दारोदार कचरा संकलन सेवा पुरवणाऱ्या ४००० ‘स्वच्छ’च्या कचरा वेचकांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे ४० लाख पुणेकरांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. दैनंदिन सेवेत सातत्याने दिसून येणारा हा प्रामाणिकपणा पुणे शहरासाठी एक भूषणावह गोष्ट आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…