क्राईम न्यूज

Pune News : हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ अन् घोषणाबाजी! पुण्यात आंदेकर टोळीच्या मोरक्याची ‘पोलीस व्हॅन’मधून सिनेस्टाईल एन्ट्री

Pune Latest News : “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही!” निवडणूक केंद्रावर बंडू आंदेकरचा हाय-व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आज कायद्याची आणि गुन्हेगारीची एक अजब सांगड पाहायला मिळाली. कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनी आज पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज भरण्यासाठी आलेल्या बंडू आंदेकरची देहबोली आणि त्याने केलेली घोषणाबाजी संपूर्ण पुणे शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

पोलीस व्हॅनमधून उतरला अन् थेट गर्जना केली!

न्यायालयाच्या परवानगीनंतर बंडू आंदेकरला कडक पोलीस बंदोबस्तात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडताच हातात बेड्या असलेल्या स्थितीत बंडू आंदेकर बाहेर पडला. तोंडावर काळा स्कार्फ बांधलेल्या आंदेकरने तिथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “नेकी का काम, आंदेकर का नाम!”, “बघा मला लोकशाहीत कसं आणलंय!”, “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही!” अशा गर्जना करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

‘वनराज आंदेकर जिंदाबाद’च्या घोषणा आपल्या मृत मुलाच्या आठवणीत त्याने “वनराज आंदेकर जिंदाबाद” अशा घोषणाही दिल्या. “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” असे म्हणत त्याने मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. टोळीयुद्ध आणि खुनाच्या गुन्ह्यात कोठडीत असतानाही आंदेकरचा हा ‘स्वॅग’ पाहून तिथे उपस्थित असलेले अधिकारी आणि नागरिकही अवाक झाले होते.

राष्ट्रवादीच्या उमेदवारीची चर्चा रंगली बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी यापूर्वीच आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. आजच्या या ‘शक्तीप्रदर्शना’नंतर आंदेकर कुटुंब राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार की अपक्ष, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago