पुणे

Pune News | धक्कादायक ! पुण्यात कचरा प्रकल्पात बाल कामगारांचे शोषण : गुन्हा दाखल झाल्याचे उघडकीस

  • अद्याप कंपनीविरुद्ध कारवाई नाही ?
  • घनकचरा विभागात सावळा गोंधळ

पुणे, दि. २३ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर Pune News

हडपसर औद्योगिक वसाहत शेवकर वस्ती येथील कचरा प्रकल्पात बाल कामगाराकडून काम करून घेतले जात असल्याने खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने पुणे मनपातील घनकचरा विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. दुकाने निरीक्षक यांनी तक्रार दिल्यावरून संबंधित कंपनी मालक व ठेकेदार यांच्यावर गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Pune News

याबाबत Wanwadi Police Station वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी मे. आदर्श भारत इन्व्हायरो प्रा. ली. चे मालक मिलिंद हरिश्चंद्र पवार, नरेंद्र रामदास सावंत व ठेकेदार रवींद्र नवनाथ म्हस्के यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कमी पैशात, जास्त वेळ लहान मुलांचे शोषण 

यावेळी दुकाने निरीक्षक यांनी सदर बाल कामगारांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी ९ ते १० हजार रुपये मासिक वेतनावर सकाळी १० ते साय ६ असे राबवून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे मनपातील Pune Corporation घनकचरा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने घनकचरा विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. 

संबंधित कंपनीवर कारवाईस टाळाटाळ !

बाल कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनी विरुद्ध पुणे महापालिकेकडून अद्याप कारवाई झाली नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात बाल कामगारांचे शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असताना देखील कंपनीवर बंधने घालण्यात आली नाहीत. 

Maharashtra Mirror

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

31 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago