Pune Latest Crime News : पुण्यात बॉम्ब साहित्य व संरक्षण संस्थांची माहिती सापडून खळबळ; 11 जणांविरुद्ध UAPAखाली गुन्हे दाखल
पुणे :- पुणे, मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या कटात सहभागी असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या (IS) फरारी दहशतवाद्याला अखेर लखनौमध्ये अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ही कारवाई केली असून, अटक करण्यात आलेल्याचे नाव रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबूल सलीना उर्फ दानिश असे आहे. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. Pune Latest Crime News
रिजवान अली मूळचा दिल्लीच्या दर्यागंज भागातील असून, पुण्यातील कोथरूड आणि कोंढवा भागात तो काही काळ वास्तव्यास होता. 2023 मध्ये पुणे पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी अटक केलेल्या दोन संशयितांकडून मोठा घातपाताचा कट उघडकीस आला होता. तपासादरम्यान, पुण्यातील कोंढवा परिसरातील एका घरातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि संरक्षण संस्थांबाबतची गोपनीय माहिती जप्त करण्यात आली होती.
तब्बल तीन लाखांचे बक्षीस जाहीर असलेल्या रिजवान अलीला अटक
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) होता, मात्र नंतर तो NIAकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान समोर आले की, इस्लामिक स्टेटशी संबंधित टोळी पुणे, मुंबई, ठाणे परिसरात घातपाताच्या कारवायांसाठी तरुणांना कटात सहभागी करून घेत होती.
या प्रकरणात NIAने पुण्यातील डॉक्टरसह 11 जणांविरुद्ध ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा’ (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. अटक झालेल्या आरोपींसोबत महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब काझी, झुल्फिकार बोराडावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन, शहानवाझ आलम, अब्दुल्ला शेख व ताल्हा खान यांची नावे आहेत.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, रिजवान अली हा स्फोटके तयार करण्याचे तसेच गोळीबार प्रशिक्षण देण्याच्या कार्यातही सक्रिय होता. तो अटकपूर्वी लखनौमार्गे देशातून पलायन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अटक करून पुढील तपासासाठी दिल्लीला आणण्यात आले आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…