पुणे

Pune News : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन; “लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर जबाबदार नागरिकत्व”पोलीस संचलन मैदानात तिरंग्याला मानवंदना

•शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी राज्य प्रगतीपथावर नेण्याचा अजितदादांचा संकल्प

पुणे | भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस संचलन मैदानात दिमाखदार ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना संविधानाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला.

शिस्तबद्ध संचलन आणि विशेष सन्मान ध्वजारोहणानंतर पोलीस दल, गृहरक्षक दल, सशस्त्र दल, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण दलाच्या वतीने संयुक्त पथसंचलन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व दलांना सन्मानपूर्वक सलामी दिली. या सोहळ्यात डॉग स्कॉड आणि सांस्कृतिक पथकांनीही आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. यावेळी कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छतेचा संदेश आणि सामाजिक बांधिलकी पुणे महानगरपालिकेच्या वतीने यंदा ‘स्वच्छता जागृती रथा’ चे सादरीकरण करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0