Pune Latest News : भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील नवीन तरतुदींवर प्रकाशझोत; ‘अनुचित गैरफायदा’ आणि अपसंपदेवरील शिक्षेची माहिती
पुणे :- पुणे बार असोसिएशनच्या Pune Bar Association वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेत बुधवारी (6 नोव्हेंबर 2025 ) ज्येष्ठ ॲड. आयुब एरा पठाण ADV Ayub Pathan (माजी सीआयडी कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य व विशेष सरकारी वकील, सीबीआय) यांनी ‘भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आणि त्याअनुषंगाने सीबीआयमार्फत दाखल होणारे खटले’ या विषयावर अत्यंत सखोल आणि मार्मिक मार्गदर्शन केले. Pune Latest News
ॲड. पठाण यांनी सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये तपास प्रक्रिया कशी असते आणि आरोपपत्र दाखल करण्याची पद्धत काय असते, तसेच खटला सिद्ध होण्यासाठी कोणत्या पुराव्यांची आवश्यकता असते, याचे विस्तृत विवेचन केले. जुन्या कायद्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबाबतच्या तरतुदी आणि 2018 मध्ये झालेल्या दुरुस्ती कायद्यातील तरतुदी यांचा विशेष उल्लेख करून त्यातील महत्त्वाचे बदल त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, जुन्या कायद्यातील बेकायदेशीरपणे लाच घेण्याच्या तरतुदींना नवीन कायद्यात ‘अनुचित गैरफायदा’ (Undue Advantage) अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूशिवाय देखील अनुचित प्रकारे देण्यात येणारा कोणताही गैरफायदा आता या कायद्याच्या कक्षेत येतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच, नवीन कायद्यात बहुतेक गुन्ह्यांसाठी कमीत कमी शिक्षा 3 वर्षांची आणि जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय सेवकाने आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय अधिकची संपत्ती मिळविल्यास आणि त्या अपसंपदेचा समाधानकारक ताळमेळ व स्पष्टीकरण न दिल्यास तो 7 वर्षांपर्यंत शिक्षेस पात्र ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्याख्यानाच्या समारोपाला ॲड. पठाण यांनी श्रीमद् भगवतगीतेतील श्लोकांचा संदर्भ देत एक मोलाचा संदेश दिला. मोह, लोभ आणि हव्यास हे कशा प्रकारे माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर मात करून भ्रष्टाचाराला जन्म देतात, यावर त्यांनी भाष्य केले. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या प्रमाणित नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून आपले धर्मसंगत आचरण केल्यास समाजातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन होण्यास मदत होईल, या संदेशाने त्यांनी आपल्या व्याख्यानाची सांगता केली.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड, उपाध्यक्ष ॲड. गुरेखा भोराले आणि शिवाजीनगर न्यायालयातील ज्येष्ठ व कनिष्ठ वकील वर्ग मोठ्या संख्येने या ऐतिहासिक अशोका हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानाला उपस्थित होते.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…