Pune News : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी

•शिवनेरी किल्ल्यावर तरुणांच्या निष्काळजीपणामुळे मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी. नैसर्गिक वास्तूंमध्ये छेडछाड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे :- पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर रविवारी (16 मार्च) मधमाशांच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. या हल्ल्यात सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली.या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली. शिवनेरी किल्ला हे थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे आणि पुण्यापासून सुमारे 90 किमी अंतरावर जुन्नर तालुक्यात आहे. या ऐतिहासिक स्थळावर दररोज शेकडो पर्यटक येतात.
जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, किल्ल्यात असलेल्या शिव मंदिराजवळ ही घटना घडली. ते म्हणाले, “प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांच्या टोळक्याने मधमाश्यांच्या पोळावर दगडफेक केली, ज्यामुळे मधमाश्या उठल्या आणि त्यांनी तेथे उपस्थित लोकांवर हल्ला केला.”
या हल्ल्यात सुमारे 60 लोक मधमाशांच्या डंखाचे बळी ठरले, त्यापैकी 50 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर उपचार करण्यात आले असून ते धोक्याबाहेर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.