पुणे

Pune News : फ्लॅटमध्ये आढळून आले 300 मांजरी, वास आणि आवाजाने लोक हैराण, तक्रार दाखल

अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. आम्हाला 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये 300 मांजरी सापडल्या. तिथे खूप वास येत होता.

पुणे :- पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी पुण्यातील एका निवासी सोसायटीच्या फ्लॅटला भेट दिली, जिथे सुमारे 300 मांजरी ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हडपसर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लॅट मालकाला मांजरांना योग्य ठिकाणी नेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

ते म्हणाले की हडपसरमधील मार्वल बाउंटी हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी तक्रार केली होती की फ्लॅट मालकाने त्यांच्या फ्लॅटमध्ये 300 हून अधिक मांजरी ठेवल्या आहेत, ज्यामुळे स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

मांजरींमुळे दुर्गंधी आणि जास्त आवाजाच्या सतत तक्रारी येत होत्या. अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. आम्हाला 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये 300 मांजरी सापडल्या. तिथे खूप वास येत होता.

यानंतर मांजरांना योग्य ठिकाणी नेण्यासाठी फ्लॅट मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत पशुसंवर्धन विभागाने फ्लॅट मालकाला लवकरात लवकर मांजरांना इतर ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तेथे राहणाऱ्या लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0