Pune Murder Mystery : हैदराबाद येथे पळून जाणाऱ्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांच्या युनिट -3 कडून अटक
Pune Murder Mystery Solved By Crime Branch 3 Pune Unit : पुणे : खुनाच्या प्रयत्नातील तडीपार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून अटक
पुणे :- वारजे पोलीस ठाण्यात Varje Police Station बी एन एस कलम 109 आणि इतर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3 Pune Crime Branch Unit 3 कडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला रेल्वे स्थानकातून त्याच्या मूळ गावी हैदराबाद येथे पळून जात असताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. Pune Police Latest News
गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 ऑक्टोबर) रोजी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या कलम 109 गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या माहिती माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी गणेश तुळशीराम पवार (21 वय, रा. शिवराम सोसायटी पुणे) हा रेल्वे स्थानकावरून त्याच्या मुळ गावी हैदराबाद येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गणेश याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता पोलिसांकडे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीचे वैद्यकीय तपासणी करून वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. Pune Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार , Pune CP Amitesh Kumar पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा,शैलेश बलकवडे , अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, निखिल पिंगळे , पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर,गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, गुन्हे शाखा,युनिट -3 यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्र्वर ढवळे,पोलीस अंमलदार/पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, संजीव कळंबे , विनोद जाधव, ज्ञानेश्वर चित्ते , हरीश गायकवाड, बंटी मोरे, गणेश शिंदे, यांनी केली आहे Pune Police Latest News