क्राईम न्यूज

Pune Mumbai Express News : पुणे-मुंबई महामार्गावर पोलिसांवर जीवघेणा हल्ला; चौघांना अटक

Pune Mumbai Express Latest News : वाहन थांबवल्याच्या रागातून दोन पोलिसांना बेदम मारहाण; खडकी परिसरात भीतीचे वातावरण

पुणे :- पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी Pune Khadki Police भागात कर्तव्य बजावत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चार तरुणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. केवळ वाहतुकीचे नियम पाळण्याची सूचना केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोर चौघांना अटक केली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, पोलीस शिपाई गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे खडकी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी, एका कारमधील तरुण वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवून चालकाला याबद्दल विचारणा केली असता, गाडीतील चौघांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, त्यांनी दोन्ही पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले.

या घटनेमुळे खडकी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यानंतर जखमी पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत, जुनेद इक्बाल शेख, नफीज नौशाद शेख, युनूस युसुफ शेख आणि आरिफ अक्रम शेख या चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago