पुणे, दि. २ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Mobile Detection | पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन चोरी झालेल्या तब्बल ५१ मोबाईलचा शोध बंडगार्डन पोलिसांकडून लावण्यात आला आहे. CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर प्राप्त तक्रारीवरून पुणे पोलिसांनी प्रभावी तपास केला आहे. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील यांच्याहस्ते २१ हस्तगत मोबाईल तक्रारदाराना सुपूर्द करण्यात आले. Pune Mobile Detection
CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अमितेष कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशान्वये व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गहाळ मोबाईलचा बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील सायबर पथकाचे पोलीस उप निरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस नाईक विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे व पोअं निलेश पालवे यांनी करुन लोकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन यांचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचा एसडीआर तसेच लोकेशन यांचेव्दारे शोध घेवून सदर गहाळ मोबाईल पैकी आज पावतो अंदाजे ५ लाख किंमतीचे एकुण ५१ मोवाईल फोन हस्तगत केले.
सदरची कामगीरी अमितेष कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे, दिपक निकम, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर व बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो.नि. रविद्र गायकवाड, पो.नि. गुन्हे संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी परमेश्वर गर्कळ, पोना विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे, पोअं निलेश पालवे, पोअं शशांक खाडे, पोअं प्रसाद पवार, पोअं ज्ञानेश्वर गायकवाड, पोअं विशाल जाधव यांचे पथकाने केली
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…