Pune Missing Girls Found | बिबवेवाडीतुन बेपत्ता झालेल्या तिन अल्पवयीन मुली आंबिवलीत सापडल्या
- बिबवेवाडी तपास पथकाची कामगीरी
पुणे, दि. ४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune Missing Girls Found
बिबवेवाडी परिसरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची गतिमान चक्रे फिरवत तिन्ही मुलींना आंबिवली येथून सुखरूप परत आणले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी सहा पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपासपथक प्रभारी अशोक येवले व तपासपथकातील कर्मचारी यांनी सदर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि.२ रोजी दुपारी ०१.३० वा.चे सुमारास शिवतेजनगर बिबवेवाडी पुणे येथून तिन अल्पवयीन मुलगी अनुक्रमे वय १२ वर्षे, १५ वर्षे, १५ वर्षे वयाच्या हया बेपत्ता झालेबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे खबर प्राप्त झालेने त्यावरून बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २०८/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उप आयुक्त आर राजा यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली बेपत्ता मुलींचा त्यांचे मित्र, मैत्रिण यांचेकडे चौकशी करून सदर मुलींचा तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने शोध घेत असताना त्या अंबविली कल्याण जि.ठाणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सदर माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमा, यांना दिलेनंतर खडकपाडा पोलीस ठाणे कल्याण येथे संपर्क करून सदर नमुद मुलींचे वर्णन सांगून त्यांना अंबिवली येथून ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे सुखरूपणे आणण्यात आले. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, विद्या सावंत हया करीत आहेत.
सदरची कामगिरी Pune Police पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, सपोनि विद्या सावंत, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार विशाल जाधव, प्रतिक करंजे, महिला पोलीस अमंलदार वर्षा ठोंबरे यांनी केली आहे.