Pune Lok Sabha Election : अजित पवार आणि राज ठाकरेंना मोठा झटका, हे नेते शरद गटात सामील?
Pune Big Breaking News : अजित पवार गट आणि राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला मोठा झटका बसला आहे. वसंत मोरे आणि नीलेश लंके हे आज शरद गटात सामील होणार असून आज ते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे.
पुणे :- पुण्यातील शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नीलेश लंके Nilesh Lanke आणि वसंत मोरे Vasant More यांनी प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला जाऊ शकतो. दोन्ही नेते पुणे शहरातील बड्या नावांपैकी आहेत. नीलेश लंके हे सध्या आमदार असून अजित पवार गट सोडून शरद पवार यांच्यात दाखल झाले आहेत. वसंत मोरे यांनी नुकताच राज ठाकरेंचा पक्ष मनसेचा निरोप घेतला आहे. या दोन्ही नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यात गेल्या काही तासांपासून बैठक चालू आहे. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे उपस्थित असून लवकरच या सर्व गोष्टींबाबत स्पष्टता येईल असे सांगण्यात येत आहे. Pune Lok Sabha Election
पक्षप्रवेश नाही केवळ भेट घेण्यासाठी मोरे
वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पक्षात प्रवेश करणार नाही. केवळ शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे एवढंच मी एवढंच सांगू शक्यतो. शिरुर लोकसभेत मी राहतो त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे. मी कार्यालयात आलो म्हणजे पक्षात प्रवेश झाला असे म्हणता येणार नाही.
जयंत पाटील ; निलेश लंके एक चांगला चेहरा
जयंत पाटील म्हणाले की, निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधील नेते आहेत. ते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहेत. ज्या आमदारांनी सह्या केल्यात त्यांना माहिती नाही कशावर सही केली, त्यापैकी निलेश लंके एक आहेत. आमचे जागावाटप अजून झाले नाही पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता निलेश लंके यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Pune Lok Sabha Election
नीलेश लंके पारनेरपुरते पॉप्युलर – अजित पवार
दरम्यान, अजित पवार यांनी नीलेश लंके यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, नीलेश लंके हा पारनेरपुरता मर्यादीत नेता आहे. पण जिल्ह्याचे राजकारण हे वेगळे असते. मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही लोकांना ऐकायचे नसल्यावर आपण काहीही करू शकत नाही. दुसऱ्या गटात जाण्याआधी त्यांना आमच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल असेही अजित पवार म्हणाले. Pune Lok Sabha Election