Pune Koyta Gang : धनकवडी येथे कोयता गँगचा ‘राडा’ : प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या ९ जणांना सहकारनगर पोलिसांनी पकडलं
पुणे, दि. ४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune Koyta Gang
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. दररोज खून, गोळीबार, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.
धनकवडी भागातील काळूबाई मंदिराजवळ दोघांवर कोयत्याने हल्ला करून पळून जाणाऱ्या ९ आरोपींना सहकारनगर पोलिसांनी तीन हत्ती चौकातून ताब्यात घेतले आहे.
आरोपी मल्लेश पांडुरंग कांबळे (वय ३८), रवी आनंद चव्हाण (वय २०), दत्ता रामचंद्र जाधव (वय २२), सार्थक बाळासाहेब कुडले (वय २०), अक्षय आप्पा मोहिते (वय २४), स्वप्निल गणेश जाधव (वय २०), आणि निरंजन उत्तम देवकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर अनंता खोपडे यांनी तक्रार दिली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. Pune Police