Pune Instagram Trap : पुण्यात इन्स्टाग्राम ठरलं ‘डेथ ट्रॅप’! 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; खेड शिवापूरमध्ये रचला रक्ताचा खेळ

Pune Instagram Murder News : मुलीच्या माध्यमातून बोलावून घेतलं कात्रजला आणि संपवलं आयुष्य; दोन आरोपींना बेड्या, तर दोन अल्पवयीन ताब्यात
पुणे | पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. सोशल मीडियाचा वापर करून एका निष्पाप मुलाचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय असे या खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. Pune Crime News
असा रचला हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगला संपवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या बनावट किंवा ओळखीच्या अकाऊंटवरून अमनसिंगला मेसेज करण्यात आला. त्याला भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावून घेण्यात आले. कोणतीही शंका न आल्याने अमनसिंग तिथे पोहोचला, मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचे अपहरण केले.
दगड आणि कोयत्याने वार
अमनसिंगला कात्रजवरून जबरदस्तीने खेड शिवापूर येथील निर्जन स्थळी नेण्यात आले. तिथे आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि दगड घालून त्याची हत्या केली. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पूर्ववैमनस्य किंवा प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांची कारवाई; दोन आरोपी गजाआड
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
1.प्रथमेश चिंधू आढळ (वय १९)
2.नागेश धबाले (वय 19)
या दोघांव्यतिरिक्त या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन विधिसंघर्षित (अल्पवयीन) मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



