Pune Hit And Run Case : पुणे कार अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? पोलिसांनी केला धक्कादायक दावा, तपास सुरू
Pune Hit And Run Case : पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी आता ‘ड्रग्ज’ अँगलनेही तपास सुरू केला आहे. आरोपींनी ‘ड्रग्ज’ही सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुणे :- कार अपघात Pune Hit And Run Case प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन Drug Connection समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आता या प्रकरणी ‘ड्रग्ज’ अँगलवर तपास सुरू केला आहे. शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या पार्टीत आरोपीने मित्रांसोबत दारूसह ‘ड्रग्ज’ सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुण्यातील पब आणि क्लबच्या पार्ट्यांमध्ये गांजा आणि चरस शोधणे अवघड नाही याची जाणीव पोलिसांना आहे. पार्टीत सहभागी होणारे बहुतेक तरुण एक जॉइंट (सुट्टा सारखी सिगारेट) बनवतात आणि रोलिंग पेपरच्या मदतीने धुम्रपान करतात. अशा स्थितीत अपघातावेळी आरोपींनी दारूबरोबरच अंमलीपदार्थही घेतले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.अल्पवयीन आरोपीने पार्टीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केले की नाही हे शोधण्यासाठी पोलिस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्याच्या निकालाची वाट पाहत आहेत. पबचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. Pune Hit And Run Case Latest Update
अपघातानंतर काही तासांतच आरोपीना जामीन मिळाल्याने बरीच टीका झाली होती, त्यानंतर बुधवारी मंडळाने अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत देखरेख केंद्रात पाठवले. Pune Hit And Run Case Latest Update
Web Title : Pune Hit And Run Case: ‘Drugs’ connection in Pune car accident case? Police made a shocking claim, investigation is on