Pune Gutkha Raid | ११ लाखांच्या गुटख्यासह कोंढव्यातील दोघांना अटक : वपोनि सुदर्शन गायकवाड यांची धडाकेबाज कारवाई
gutkha raid pune
- गुन्हे शाखेकडून गुटखा विरोधी मोहीम | Pune Gutkha Raid
पुणे, दि. १ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Gutkha Raid | पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Cp Amitesh Kumar यांनी तरुणांना व्यसनाधीन बनविणाऱ्या गुटख्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून कोंढव्यातील दोघांना ११ लाख रुपयांचा गुटखा वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे, सपोआ मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड Police Inspector Sudarshan Gaykwad यांनी सदर कामगिरी केलीय आहे.
संशयित मुदस्सर इलियास बागवान वय 40 वर्ष ,रा. भाग्योदय नगर कोंढवा, Kondhwa पुणे, व अन्वर शरबुद्दीन शेख वय 38 वर्ष रा. भाग्योदय नगर कोंढवा पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नवे आहे.
अटक आरोपी मुदस्सर बागवान व अन्वर शेख यांच्या ताब्यात समर्थ पोलीस Samarath Police Station हद्दीत, अय्यापा मंदिरा जवळ, नाना पेठ या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रित करण्याची तंबाखू व त्यास शासनाने प्रतिबंधित केले असलेला घातक पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याचे मिळून आला. सोबत मालाची ने आण करणे कामी वापरातील टेम्पो क्र. MH12, TU 3643 देखील जप्त करण्यात आलेला आहे.
यातील अन्वर शेख विरुद्ध पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ विक्री विरोधात गुन्हा दाखल आहे. सदर कारवाई वपोनि सुदर्शन गायकवाड यांच्या नेत्तृत्वाखाली सपोनि नाईक, पीएसआय दळवी, हेड कॉन्स्टेबल गायकवाड, पो शि कांबळे, पो शि पाटील यांनी केली. याप्रकरणी समर्थ पो स्टे येथे गु. र. नं. 209/2024 प्रमाणे गुन्हा नोंद कारण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांचे आदेशानुसार समर्थ पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेला आहे. माल कोठून आणला या बाबत आरोपी यांचेकडे चौकशी केली असता सदरील माल हा कर्नाटक येथून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे. पो शि 9841 पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर कारवाई करण्यात आली.