
Pune GBS News : पुण्याच्या आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी जीबीएसची लागण झालेल्या एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ‘इस्केमिक स्ट्रोक’मुळे मृत्यू झाला.
पुणे :- पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. Pune GBS Died News पुणे जिल्ह्यातील 63 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) संशयित मृतांची संख्या 6 झाली आहे. पुणे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी याला दुजोरा दिला.पुणे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ताप, जुलाब आणि पाय अशक्त झाल्याच्या तक्रारीनंतर या वृद्धाला सिंहगड रोड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला जीबीएसची लागण झाल्याचे तपासात समोर आले.
पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणाले, “बुधवारी वृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडली आणि ‘इस्केमिक स्ट्रोक’मुळे त्यांचा मृत्यू झाला.” या अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 वरून 6 झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तीन नवीन प्रकरणे आढळून आल्याने पुण्यातील GBS च्या संशयित रुग्णांची संख्या 173 वर पोहोचली आहे.