क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Gavathi Daru Busted News : गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांनी टाकला छापा, 3.55 लाखाची गावठी हातभट्टीची दारू जप्त

Pune Police Busted Gavathi Daru Adda : छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे :- वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील नदी किनारी असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर कल्याण गुन्हे शाखा कक्ष-6 धडक कारवाई केली आहे. Pune Police Busted Gavathi Daru Adda या कारवाई दरम्यान पुणे गुन्हे शाखा कक्ष-6 तब्बल 3 लाख 55 हजार रुपयांची गावठी हातभट्टीचे दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले असून ही हातभट्टी पेटवून उध्वस्त केली.

या छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील नदी किनारी असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-6 पोलीस अधिकारी ऋषिकेश व्यवहारे आणि ऋषिकेश ताकवणे यांना मिळाली होती. पथकाने या हटभट्टीवर छापा टाकला. त्याठिकाणी गावठी दारू, गावठी दारू बवण्याचे साहित्य, असा एकूण 3 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हातभट्टी पेटवून नष्ट केली. या छाप्या दरम्यान 9,800 लेटर कच्चे रसायन व इतर साहित्य व 70 लिटर तयार दारू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस पथक
पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 राजेंद्र मुळीक, प्रभारी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यूनिट -6 वाहिद पठाण, सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0