क्राईम न्यूज

Pune Gangwar News : दोन टोळ्यांमधील रक्तरंजित युद्धात निष्पाप तरुणाचा बळी! ‘आंदेकर टोळी’कडून ‘कोमकर’ कुटुंबावर हल्ला

Pune Latest Crime News : नागपूर कारागृहातून वडिलांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल; स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे :- शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात दशकानुदशके सुरू असलेले आंदेकर आणि कोमकर कुटुंबातील टोळी युद्ध आता एका निष्पाप तरुणाच्या बळीने रक्तरंजित वळणावर पोहोचले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीने थेट गणेश कोमकरच्या 19 वर्षांच्या मुलाची, आयुषची, निर्दयीपणे हत्या केली आहे. 5 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. Pune Latest Crime News

दहशत आणि सूडाच्या साखळीने घेतला 19 वर्षांच्या आयुषचा जीव; 11 गोळ्या झाडून निर्दयी हत्या

ही घटना रात्री आठ वाजता घडली, जेव्हा आयुष आपल्या लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन येत होता. अचानक आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी आयुषवर गोळ्यांचा वर्षाव केला. पिस्तुलातून झाडलेल्या 11 गोळ्यांपैकी नऊ गोळ्या थेट आयुषच्या शरीरात घुसल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. काहीच चूक नसताना केवळ गुन्हेगारी वैरामुळे आयुषचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर कारागृहातून वडिलांना पॅरोल

वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला आयुषचा वडील, गणेश कोमकर, सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी त्याला खास पॅरोलवर पुण्यात आणण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात गणेशने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला आणि त्याचा आक्रोश अनावर झाला.

“माझ्या मुलाची काय चूक होती?”

पोलिसांच्या गाडीतून उतरताच गणेशने हंबरडा फोडला. “माझ्या मुलाची काय चूक होती? माझ्या जागी मलाच का नाही मारलं?” असा टाहो फोडत तो रडू लागला. सोबत आणलेले, आयुषने त्याला जेलमध्ये पाठवलेले ‘आय लव्ह यू पप्पा’ लिहिलेले ग्रिटींगकार्ड पाहून तो अधिकच शोकाकुल झाला. “बाळ, तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन आलोय मी…” असे म्हणत गणेशने मुलाच्या पार्थिवाला अखेरचा निरोप दिला. गणेशचा हा आक्रोश आणि एका निष्पाप तरुणाचा बळी पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. एका जुन्या गुन्हेगारी वैराची ही किंमत एका निष्पाप जीवाने चुकवल्याने पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासात आणखी एक काळा अध्याय जोडला गेला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago