Pune Latest Fraud News : चतुःशृंगी परिसरात व्यावसायिकाची 37 लाख रुपयांची फसवणूक; नांदेड सिटीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे :- पुणे शहरात गुंतवणूक आणि शेअर बाजारात Pune Share Market Fraud News भरघोस परतावा देण्याच्या आमिषाने नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याच्या दोन मोठ्या घटना एकाच वेळी उघडकीस आल्या आहेत. या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये व्यावसायिकांचे एकूण 51 लाख 17 हजार रुपये फसवणूक करून हडप करण्यात आले आहेत. Pune Latest Fraud News
पिंपरी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाची कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी आणि व्यावसायिकाची 2022 मध्ये ओळख झाली होती. आरोपी हे सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत राहणारे आहेत. व्यावसायिकाने सुरुवातीला 26 लाख रुपये गुंतवल्यानंतर सप्टेंबर 2023 पर्यंत आरोपींनी परतावा दिला, मात्र त्यानंतर परतावा देणे बंद केले. आपली रक्कम परत मागितल्यावर आरोपींनी मुद्दल आणि परतावा दोन्ही देण्यास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. Pune Latest Crime News
दुसऱ्या एका घटनेत महर्षीनगर येथील एका व्यक्तीला शेअर बाजारात जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 14 लाख 17 हजार रुपयांना लुटले. सप्टेंबर महिन्यात तक्रारदाराला त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून जास्त परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यावर 14 लाख 17 हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत. दोन्ही घटनांमध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे पुणेकरांनी अशा प्रकारच्या त्वरित आणि मोठ्या परताव्याच्या आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…