क्राईम न्यूज

Pune Fraud News : घर आणि नोकरीच्या आमिषाने दोन ठिकाणी तब्बल 74 लाखांची फसवणूक!

Pune Crime News : पीएमआरडीएत घर देतो म्हणत महिलेला गंडा; निगडीत ’90 लाख पॅकेज’च्या नावाखाली पैसे उकळले

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) घर मिळवून देण्याचे आमिष आणि 90 लाखांचे नोकरी पॅकेज दाखवत दोघा नागरिकांची एकूण 74 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे दोन वेगवेगळे प्रकार उघडकीस आले आहेत. हे दोन्ही प्रकार पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले असून, पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. Pune Latest News

पीएमआरडीएमध्ये घर मिळवून देतो म्हणत महिलेला 46 लाखांचा गंडा

पिंपरी परिसरातील 35 वर्षीय महिलेला PMRDA अंतर्गत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी 46 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन महिला आरोपींसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी PMRDA मध्ये लोकांनी न स्वीकारलेल्या घरे मिळवून देतो, असे सांगत शासकीय कागदपत्रे दाखवून बनावट अर्ज भरून घेतले. त्यानंतर ऑनलाइन आणि रोख स्वरूपात पैसे उकळले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही घर न देता महिलेसह इतर नागरिकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार करत आहेत.

90 लाख पॅकेज’च्या नोकरीचं स्वप्न दाखवून 28 लाखांची फसवणूक

दुसऱ्या घटनेत, निगडी येथील सुनील सदाशिव सोळांकुरे (वय 53) यांना 90 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळेल, अशा बनावात फसवले गेले. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ऑनलाइन पैसे मागून तब्बल 28 लाख 32 हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात कोणतीही नोकरी दिली न गेल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोळांकुरे यांनी निगडी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवण्याचे आणि आर्थिक व्यवहारांचे ट्रेल तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता, कोणतीही व्यवहार शासकीय खात्री व कागदपत्रे पडताळल्याशिवाय करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

vivek

Recent Posts