क्राईम न्यूजठाणेमुंबई

Pune Fraud News : कर्ज देतो’ सांगून फसवणूक; फुगेवाडीतील युवकाला 30 हजारांचा ऑनलाईन गंडा

Pune Latest Fraud News : व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे संपर्क साधून अनोळखी व्यक्तीने कागदपत्रे घेतली ; फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या नावावरच 27 हजारांचे कर्ज घेतले

पुणे :- ‘लोन’ (कर्ज) मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने फुगेवाडी येथील एका 33 वर्षीय युवकाला तब्बल 30 हजार 591 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात Dapodi Police Station अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप आणि फोनकॉलद्वारे संपर्क साधला. त्याने फिर्यादीला कर्ज मंजूर करून देतो असे सांगून त्यासाठी लागणारी कागदपत्रे घेतली. Pune Latest Fraud News

संमतीशिवाय घेतले कर्ज

कागदपत्रे हाती आल्यानंतर आरोपीने एका फायनान्स कंपनीकडून फिर्यादीच्या नावाने त्यांच्या संमतीशिवाय थेट 27 हजार रुपयांचे कर्ज घेतले.

यापुढे जात, आरोपीने फिर्यादीला 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी त्याने 23 हजार 814 रुपयांचे ‘प्रक्रिया शुल्क’ (Processing Fee) भरावे लागेल, असे सांगितले. हे शुल्क भरल्यास 5.25 लाखांचे कर्ज फिर्यादीच्या खात्यावर त्वरित जमा होईल, असे आमिष दाखवण्यात आले.

या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादीने 23 हजार 814 रुपयांचे प्रक्रिया शुल्क एका अनोळखी स्कॅनरवर पाठवले. यासह आरोपीने फिर्यादीची एकूण 30 हजार 591 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 33 वर्षीय युवकाने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दापोडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत आणि नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0