क्राईम न्यूज

Pune Dry Day : ‘ड्राय डे’ असताना अवैध मद्य विक्री; हिंजवडीत हॉटेल मालकासह जागा मालकावर गुन्हा दाखल

Pune Illegal Liquor Seller Arrested : 44 हजारांचे मद्य जप्त; नियमांचे उल्लंघन करत आर्थिक फायद्यासाठी हॉटेलचा वापर

पुणे/हिंजवडी :- ‘ड्राय डे’ (मद्य विक्रीस बंदी) असतानाही बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह व्यवस्थापक आणि जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी परिसरातील Pune Hinjewadi साखरेवस्ती येथे उघडकीस आली आहे. Pune Latest Crime News

पोलीस शिपाई अजित शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात Pune Hinjewadi Police Station यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि जागा मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक आणि व्यवस्थापक यांनी ‘ड्राय डे’ असताना, तसेच मद्य विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये मद्य विक्री सुरू ठेवली होती. यावेळी पोलिसांनी कारवाई केली असता, त्यांच्याकडे 44 हजार 865 रुपये किमतीची मद्य विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली.

या कारवाईत जागा मालकाची भूमिकाही संशयास्पद आढळली आहे. हॉटेल मालकाकडे मद्य विक्रीचा वैध परवाना नाही हे माहीत असताना देखील जागा मालकाने आपली जागा हॉटेल चालवण्यासाठी आणि अवैध मद्य विक्रीसाठी भाड्याने उपलब्ध करून दिली, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

40 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago