पुणे

Pune Drugs News : अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेची कोथरूड भागात धडक कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

•4.18 लाख रुपयांचा  एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

पुणे :- पुण्याच्या कोथरूड परिसरात अंमली पदार्थ Pune Drugs News विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्या कडून 4.18 लाख रुपयांचा एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे.

तेजस सुरेश गोपाळ ( 22 वय) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख 18 हजार किमती अंमली पदार्थ Pune Drugs News जप्त केला आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ विक्री-खरेदी, तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाकडून पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीनुसार वनाज मेट्रो स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक ठिकाणी तेजस हा एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए हा अंमली पदार्थ घेऊन असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी तेजस याला ताब्यात घेतले आहे त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना चार लाख 18 हजार रुपये किंमतीचा एल.एस.डी आणि एम.डी.एम.ए हा अंमली पदार्थ पोलिसांना सापडला. पोलिसांनी आरोपी तेजस याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क) आणि 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील गुन्ह्याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक-2 पुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक हे करत आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-2. गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, नितीन जगदाळे, निलम पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0