क्राईम न्यूज

Pune Drug News : 10.60 लाख रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

Pune Police Take Action On Drug Sumggler : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक-2 गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून खडकी भागातून 10 लाख रुपयांहून अधिकच्या किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

पुणे :- पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी-2 गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई Pune Crime Branch करून 10 लाख रुपयांहून अधिकच्या किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 10 lakh Worth Drug या प्रकरणात पोलिसांनी एका जणांना अटक केली आहे. Pune Latest Crime News

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि त्यांचे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे एक व्यक्ती R15 या स्पोर्ट्स बाईकवरून संशयितरित्या हालचाली करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याची अंगझडती घेतली असता 53 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला.बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी, (वय 21 रा. जाधववाडी, सीएनजी पंपाजवळ, मोशी, पुणे मुळ गाव राजस्थान ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दहा लाख 60 हजार रुपये किंमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच,R15 ही स्पोर्ट्स बाईक ही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2,राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, पोलीस हवालदार रोकडे, शेख, राक्षे, पोलीस शिपाई शेख,पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago