पुणे

Pune Digital Arrest Hub : पुणे बनतेय ‘डिजिटल अरेस्ट’चे केंद्र! गेल्या पाच महिन्यांत 9 कोटींचा ऑनलाईन गंडा; फसवणुकीचं नवं रूप

•Pune Cyber Fraud : सीबीआय, ईडीच्या नावाने धमकी देत घेतात व्हिडीओ कॉल… आणि सुरु होते पैशांची उधळपट्टी!

पुणे | पुणे आता आयटी हबसोबतच ‘सायबर गुन्ह्यांचा हब’ म्हणून नाव कमावत आहे. गेल्या पाच महिन्यांत शहरात डिजिटल अरेस्टच्या तब्बल 21 घटना घडल्या असून, यातून 9 कोटी 21 लाख रुपयांचा गंडा घातला गेलाय. गुन्हेगार पीडितांना कॉल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे धमकावत, “तुमचं सिम ब्लॉक होईल”, “मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आहे”, “तुमच्यावर अटकेचा वॉरंट काढलेला आहे” असे सांगत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात.

गुन्हेगार स्वतःला सीबीआय, आयकर विभाग, कस्टम्स, ईडी, एनसीबी किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवतात. हे कॉल व्हॉट्सअ‍ॅप, स्कायपसारख्या प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ स्वरूपात केले जातात आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी पैसे भरावे लागतील, अशी भीती दाखवली जाते.

या फसवणुकीचा बळी ठरणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांपासून ते प्राध्यापक, शिक्षक, आयटी कर्मचारी, अभियंते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सायबर पोलिसांकडून जनजागृती सुरू असूनही फसवणुकीच्या घटनांमध्ये अजिबात घट दिसून येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0