पुणे

Pune Cyber Fraud News : अनधिकृत लोन अ‍ॅप्सवर सायबर पोलिसांचा हल्ला!

•गुगल प्ले स्टोअरवरून 5 फसवणूक करणारी लोन अ‍ॅप्स हटवली

पिंपरी-चिंचवड | विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांची अनधिकृत लोन अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरून पाच फसवणूक करणारी लोन अ‍ॅप्स हटवण्यात यश आले असून यामुळे कोट्यवधी रुपयांच्या संभाव्य नुकसानास आळा बसला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सायबर पोलिस ठाण्यात अशा अ‍ॅप्सविरोधात तक्रारी येत होत्या. तपासात या गुन्ह्यांचे मुळ गुगल प्ले स्टोअरवरील अ‍ॅप्समध्ये असल्याचे स्पष्ट झाले. या अ‍ॅप्सने आरबीआय किंवा सेबीकडून अधिकृत परवाने असल्याचे खोटे भासवून नागरिकांना गंडा घातला होता.

पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गुगलशी थेट संपर्क साधून ‘क्रेडिट लेन्स’, ‘रॅकप्म्टा’, ‘आरपीएमटीए’, ‘क्रेडिट पायलट’ आणि ‘रेबा रोख’ ही 5 अ‍ॅप हटवण्यास भाग पाडले.

याशिवाय ‘कीक्रेडिट’, ‘एससी एलिट व्हीआयपी’, ‘लुमेनमॅक्‍स’, ‘रूपांतरण’ ही आणखी काही संशयित अ‍ॅप्स बंद करण्यासाठी देखील पत्रव्यवहार सुरू आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “कोणतेही लोन अ‍ॅप वापरण्याआधी ते आरबीआय अथवा सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक फसवणूक टळणे कठीण आहे.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago