Pune Crime : पुणे पुन्हा एकदा हादरलं! पोलिसांवर दरोडेखोरांचा भ्याड हल्ला

•Attack On Pune Police स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर, दरोडेखोरांनी पोलिसांवर केला हल्ला, कोयत्याने हल्ला, झाडल्या 2 गोळ्या ; पुण्याच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह?
पुणे :- दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. पोलीस आणि दरोडेखोर आमनेसामने आल्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे पुणे खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातल्या केंदूर घाटातली मध्यरात्री घडलेली ही घटना आहे.
एकीकडे पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरण ताजं असताना दुसरीकडे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला झाला आहे. सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने यंदाच्या विरोधकांना पुणे सुरक्षेतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.